एक्सल बेकरीचे मालक दिनेश नायर यांचे निधन

Edited by:
Published on: May 30, 2025 11:26 AM
views 747  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील एक्सल बेकरीचे मालक दिनेश नायर  (61) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते गेल्या काही महिन्यापासून आजारी होते.त्यातच त्याचे गुरूवारी निधन झाले. मूळचे केरळ येथील असलेल्या नायर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सावंतवाडीत बेकरी व्यवसाय केला होता.यात त्याचा चांगला जम ही बसला होता.त्यांची येथील आरपीडी हायस्कूल समोरील बेकरी प्रसिद्ध होती.त्याच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई असा परिवार आहे.