
बांदा : इन्सुली ते बांदा येथील नदीतील गाळ उपसा करण्याकरिता दिलेल्या परवानगीपेक्षा तसेच रॉयल्टीच्या प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात उत्खनन करून वाळू तसेच नदीतील गोटे यांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप निगुडे गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते महेश सावंत यांनी केलाय.
तसेचं परवानगी देण्याच्या अगोदर बेकायदा उत्खनन करून लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही त्यांनी तहसीलदार सावंतवाडी यांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. दरम्यान, असच या उत्खननामुळे नदी काठच्या जमिनीची धूप होऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी भीतीसुद्धा सावंत यांनी व्यक्त केलीय. तसेच या गाळाचे वाळू व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा साठे केले असल्याचा आरोपही सावंत यांनी या पत्रात केलाय.
अशाप्रकारे बेकायदा उत्खनन करणाऱ्या व त्यांचे साठे करणाऱ्या व्यवसायिकांवर तात्काळ कारवाई करावी, त्याठिकाणी प्रत्यक्ष जात पाहणी करावी अशी मागणी महेश सावंत यांनी तहसीलदार सावंतवाडी यांच्याकडे केलीय.