आंबोलीतील विद्यूत पोल सडला...!

पर्यटकांसह स्थानिकांना धोका | लक्ष वेधूनही महावितरण सुशेगात
Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2025 17:05 PM
views 85  views

सावंतवाडी : महावितरणची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंत्रणा पुर्ती ढासळलेली आहे. अवकाळी पावसानेच महावितरण अधिकाऱ्यांच्या नाकी दम आणला आहे. वर्षांनुवर्ष केलेलं दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव याला कारणीभूत ठरला आहे.‌ यातच आंबोली सारख्या भागात देखील झालेलं दुर्लक्ष समोर आलं आहे. विद्युत खांब पूर्णतः गंजला असून धोका निर्माण झाला आहे. 

आंबोली हे पर्यटन क्षेत्र असून लाखो पर्यटक देश विदेशातून इथे येतात. मात्र, येथील विद्यूत पोल गंजत असून महावितरणच तिथे लक्ष नाही. महावितरण अधिकाऱ्यांनी याबाबतचा सर्वै करणं आवश्यक होतं. मात्र, ते होत नसल्याने हे प्रकार होत आहे. आंबोली सारख्या वर्दळीच्या ठिकाणी पोल गंजून अद्यापही याकडे महावितरणच लक्ष नाही आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची वाट वीज वितरण कंपनी पहात आहे का ? असा सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत. शंभर वेळा सडलेला खांब बदलण्यासाठी विनंत्या केल्या.परंतु, कोणीही याकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही. हा सडलेला लाईटचा खांब भर वस्तीमध्ये आहे. आंबोलीच्या वादळ वारा पावसामुळे कधीही कोसळू शकतो. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. लाईटचे खांब बदलण्यासाठी सुद्धा आम्ही उपोषण करायची का ? असा सवाल संतप्त आंबोली ग्रामस्थांनी केलाय.