
सावंतवाडी : विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी झाले असून अध्यक्षपदी रविकिरण चिंतामणी तोरसकर आणि उपाध्यक्षपदी निशांत चिंतामणी तोरसकर यांची निवड करण्यात आली आहे. कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ कोलगाव सिंधुदुर्ग ही संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून संस्थापक म्हणून चिंतामणी तोरसकर यांचा या संस्थेच्या वाटचालीत मोठं योगदान आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची स्वप्नपूर्ती व्हावी या दृष्टीकोनातून संस्थेतील विविध घटकातील सभासदांनी कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकत्र येऊन विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल निवडणूकीस उभे केले होते. यामध्ये अध्यक्ष रविकिरण तोरसकर, उपाध्यक्ष निशांत तोरसकर, सचिव पूनम नाईक, सहसचिव डॉ.ज्योती रविकिरण तोरसकर ,खजिनदार हेमंत वालकर, कार्यकारीणी सदस्य श्रीम. संगीता तोरसकर, सौ. अलका नारकर, देवेंद्र राऊळ, मनोज सातार्डेकर, दयानंद सराफ, प्रवीण आचरेकर गणेश आरोंदेकर, नितीन सावंत, सौ.चित्रलेखा हिंदळेकर, प्रसन्ना राठोड असे सर्व पंधरा सदस्य बहुमताने निवडून आले. संस्थेची निवडणूक कोलगाव माध्यमिक विद्यालय पार पडली. धर्मदाय आयुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या देखरेखी खाली ही निवडणूक पार पडली. विजयी उमेदवार यांना संस्थेचे आजीव सभासद डॉक्टर विवेक रेडकर व सर्व सभासदांनी तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालय कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य विषयक विषयात संस्था मजबुतीने काम करेल असा आशावाद व्यक्त केला.