
सावंतवाडी : शहरातील दैवज्ञ मंदिर शेजारी असणाऱ्या सार्वजनिक शौचालय शेजारी पाण्याचं साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली आहे. शालेय विद्यार्थी, महिलांसह ज्येष्ठांना या मार्गावरूनच पाण्यातून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे.
पावसाचं पाणी साठून येथे डासांची पैदास देखील होत आहे. तसेच रोगराईला आमंत्रण मिळत आहे. आधीच साथरोगाची लाट असताना त्यात अधिक भर पडत असून नगरपरिषद प्रशासन व आरोग्य विभागाच अक्षम्य असं दुर्लक्ष या ठिकाणी झाले आहे. न.प. प्रशासनानं याकडे लक्ष देत तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.