
सावंतवाडी : तालुक्यातील कारीवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांच्यासोबत हस्तांदोलन करत भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी कौतुक केले. सुभेदार मेजर संजय सावंत हे ऑपरेशन सिंदूरमध्ये एअर डिफेन्स सिस्टममध्ये कार्यरत होते. त्यांनी शत्रुचे ड्रोन आणि मिसाईल आपल्या पोझिशन पासून पुढे जायला दिले नाही. त्यांच्या टीमने अचूक निशाणा साधून ड्रोन आणि मिसाईल जमिनदोस्त केले.