
सावंतवाडी : आंबोली चेकपोस्ट येथे सकाळी ८.३० च्या सुमारास गोवा ते गुजरात जाणारे वाहन क्रमांक GJ 19/Y/5098 महिंद्रा पीकअप या वाहनाची तपासणी करत असताना वाहनात पत्र्याचे कंपार्टमेंट बंद असल्याने ते कट करून तपासले असता त्यामध्ये गोवा बनावटीचे व्हीस्कीचे ११० बॉक्स मिळून आले. यात आरोपी शैलेश कुमार रामाभाई बारिया (राह. जिल्हा पंचमहाल, गुजरात) याचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एकूण दारू - 6, लाख 33 हजार 600 व वाहन किंमत 10 लाख मिळून एकूण 16 लाख 33 हजार 600/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व आंबोली दुरक्षत्र अंमलदार पो. हवालदार रामदास जाधव, लक्ष्मण काळे, पोलिस नाईक मनिष शिंदे, होमगार्ड आनंद बरागडे व चंद्रकांत जंगले यांनी आंबोली चेकपोस्ट येथे केली.