'सक्ती'पीठ महामार्ग नको : डॉ. जयेंद्र परुळेकर

Edited by:
Published on: May 18, 2025 14:51 PM
views 90  views

सावंतवाडी : बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या बारा गावांतून जाण्यासाठी प्रस्तावित आहे त्या पैकी डेगवे गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारा प्रस्ताव पारित केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके मारू असं म्हणणारे आता डेगवे ग्रामस्थांना देखील घरोघरी जाऊन फटक्यांचा प्रसाद देणार का ? असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. पवनार ते पत्रादेवी मधील विविध शक्तीपीठं जोडणारा हा महामार्ग आहे असं राज्यकर्त्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकंदर वातावरण बघता हा शक्तीपीठ आहे की 'सक्ती' पीठ महामार्ग आहे हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे असंही डॉ परुळेकर यांनी म्हटले आहे.