
सावंतवाडी : शहरासह प्रत्येक गावांतही बेवारस कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. एरव्ही फक्त भाद्रपद महिन्यात टोळी टोळीने फिरणारे बेवारस कुत्रे आता बाराही महिने राजरोस रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात टोळी टोळीने फिरत असतात. त्यामुळे बायकां लहान मुलांसह महिला व पादचाऱ्यांना फिरणे कठीण झाले आहे. त्यात दुचाकीवरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या थेट अंगावर उड्या मारून अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बेवारस कुत्र्यांच्या या उपद्रवामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या अनेकांना हातात काठी घेऊनच फिरावे लागते. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात बेवारस प्राण्यांमध्ये रेबीजचे प्रमाण असल्यामुळे चावल्यावरती इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय नसतो. उपचाराबाबत दुर्लक्ष केल्यास नाही रेबीजमुळे मृत्युमुखी पडण्याची वेळ येते.
या मोकाट सुटलेल्या बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने या भटक्या कुत्र्यांनी चावल्यावर रेबीजचा उपद्रव होऊ नये म्हणून त्यांना मिशन रेबीज या संस्थेतर्फे मोफत रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. तसेच बेवारस कुत्र्यांची उत्पत्ती थांबावी म्हणून या बेवारस कुत्र्यांची नसबंदीही केली जाते. परंतु दिवसा हे लपलेले श्वान व रात्री मोकाट सुटलेले कुत्रे शोधून काढणे कठीण होते. प्रत्येक गावातील स्थानिकांनाच या कुत्र्यांचा अड्डा माहीत असतो. या बेवारस कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधक लस देण्याऱ्या या टीमला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यवेक्षक तसेच ओटवणे गावातील शॉनप्रेमी विकास पारकर यांनी श्वान नसबंदी व रेबीज करणाऱ्या टीमला सहकार्य करण्याचे ठरविले असुन संस्थेच्या या उपक्रमाला ते सहकार्य करीत आहेत. त्यामुळे लवकरच या भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात होणारी उत्पत्ती थांबून गावोगावी कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे बेवारस कुत्र्यांचा उपद्रव कमी होऊन लहान मुलांसह महिला, पादचारी व वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे. या दृष्टीने या संस्थेने या उपक्रमाची सुरुवात केली असून संस्थेच्या सात जणांच्या टीमला सोबत म्हणून गावातील स्थानिक तरुणांनी संस्थेच्या या स्त्युत उपक्रमाला सहकार्य करून अधिक माहितीसाठी 7744029586 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन ओटवणे गावातील सेवाभावी युवक विकास पारकर यांनी केले आहे.