'तो' बॅनर पुन्हा नगरपरिषदेच्या समोरच लावला

Edited by:
Published on: May 05, 2025 14:41 PM
views 784  views

सावंतवाडी : दहशतवाद असाच संपवावा लागतो. ४०० वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले आणि आज ही....२७ लोकांना धर्म विचारुनच मारले....काहीच बदलले नाही....!'' या आशयाचा बॅनर काही दिवसांपूर्वी न.प.कडून हटविण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तो बॅनर त्या ठिकाणी झळकला. तसेच नगरपरिषदेच्या समोर देखील या अशयाचा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावला. 

या बॅनरमध्ये नागरिकांना धर्म आणि नाव विचारूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. "दहशतवाद असाच संपवावा लागतो ! ४०० वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले, आणि आज ही.... २७ लोकांना धर्म विचारुनच मारले... काहीच बदलले नाही... म्हणून तुम्ही किमान धर्म, नाव विचारुनच खरेदी करा. १००% हिंदूंकडूनच खरेदी करा” असे आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जागरण मंच, सकल हिंदू समाज, सिंधुदुर्ग यांचा यावर उल्लेख आहे. सावंतवाडी शहरात यापूर्वीही अशा प्रकारचे बॅनर लागले होते. ते नगरपरिषदने परवानगी नसल्याने हटवले होते. तसेच अनधिकृत बॅनरवर कारवाई केली होती. त्यानंतर आता न.प.च्या समोर हा बॅनर झळकलेला दिसतोय.