सावंतवाडी : नरक दहनानंतर दीपावली निमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. सावंतवाडी येथील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर येथे पहाटे सावंतवाडीकर नतमस्तक झाले. विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार देखील या निमित्ताने एकत्र दिसून आले.
दीपावली निमित्त सावंतवाडीकर श्री विठ्ठल रखुमाई चरणी नतमस्तक झाले. पहाटेच्या काकड आरती प्रसंगी महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन तेली एकत्र दिसून आले. दोघांकडून विठ्ठलाचे दर्शन घेत आराधना करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना दीपक केसरकर व राजन तेलींकडून दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.