सावंतवाडी भाजप महिला मोर्चाने पोलिसांना बांधल्या राख्या

Edited by: विनायक गांवस
Published on: August 22, 2024 11:24 AM
views 240  views

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलिस बांधवांना शहर भाजप महिला मोर्चा तर्फे रक्षाबंधन करण्यात आले. समाजासाठी २४×७ सतर्क असणाऱ्या वर्दीतील लाडक्या भावांची ओवाळणी करून भाजप महिला मोर्चाच्यावतीन त्यांना राख्या बांधण्यात आल्या 

 सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलिस बांधवांना शहर भाजप महिला मोर्चा तर्फे रक्षाबंधन करण्यात आले. समाजासाठी २४×७ सतर्क असणाऱ्या लाडक्या भावांची ओवाळणी करून त्यांना राख्या बांधल्या. यावेळी भाजपच्या पदाधिकारी शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर नगरसेविका दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, मेघा भोगटे, अस्मिता भराडी,साक्षी गवस, शिल्पा सावंत, गीता नाईक, स्नेहल जाधव, ज्योती मुद्राळे आदी महीला उपस्थित होत्या .