
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थामधील कर्मचाऱ्यांठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही संस्था स्थापन केली आहे. तसेच पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी व त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या संस्थेच्या माध्यमातून काम करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडी या संस्थेतर्फे जिल्ह्यातील पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांच्याहस्ते दिपप्रज्वलन केले. यावेळी संस्थेचे चेअरमन सुनिल राऊळ यांनी आपल्या प्रास्ताविकात कर्मचाऱ्यांसमोर विविध अडचणी व त्यांचे सेवा नियम व शासकिय योजनाचा कर्मचाऱ्यांसाठी कसा फायदा असतो याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी स्नेह नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर, प. पू. भालचंद्र महाराज पतसंस्था खारेपाटणचे उपाध्यक्ष राजेंद्र ब्रम्हदंडे व सचिव श्री. मोरे, महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. किर्ती बोन्द्रे, सैनिक पतसंस्थेचे संचालक श्री. कोचरेकर, झाराप विविध कार्यकारी सो. संचालक श्री. आळवे, संस्थेचे उपाध्यक्ष जेम्स बॉर्जीस व कामगार कल्याण केंद्राच्या अधिकारी नम्रता आराबेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात संस्थचे अध्यक्ष सुनिल राऊळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या १० वी, १२ वी व पदवीधर उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मुलांचा गुणगौरव करण्यात
आला. यापुढे संस्थेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सहकारातील विकास संस्था, मजुर संस्था, औद्योगिक संस्था व इतर सहकारातील कर्मचा-यांना संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम केले जाणार आहे व आर्थिक सक्षम बनवणार असल्याचे सुनिल राऊळ यांनी यावेळी सांगितले. उद्घाटक बाबुराव कविटकर यांनी पतसंस्थाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे व योग्य रितीने करणे काळाची गरज आहे. कर्मचाऱ्यांनी जर आपल्या जवाबदाऱ्या व कर्तव्य परिपूर्ण केली तर त्यांना योग्य प्रकारे मोबदला संस्थेकडून दिला जातो. आपण केलेल्या कामाचे वरीष्ठांकडे त्यांची माहीती देणे गरजेचे आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. स्नेह नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी कर्मचाऱ्यांना पतसंस्थाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कामगार कल्याणचे अधिकारी सौ. नम्रता आराबेकर यांनी कामगार कल्याण कार्यालयाच्या कामगारांना विविध योजनेचा कसा लाभ घेता येईल व योजनाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भविष्यनिर्वाह निधी कार्यालय कोल्हापूरचे श्री. सोळुंखे यांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष जेम्स बॉर्जेस यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक फेडरेशनचे सचिव श्री. महेश्वर कुंभार यांनी केले.