
सावंतवाडी : तालुक्यात रात्री पासूनच मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गेल्या आठवड्यातील रविवारी देखील असाच पाऊस कोसळल्यानं काही भागात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. सावंतवाडी शहरातील बाजारपेठेतही पाणी शिरलं होत. याप्रमाणे आजही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पडझड, पाणी येण्यासारखे प्रकार घडले आहेत. आरोंदा येथे देखील पाणी साचलं आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाड पडण्याचे प्रकार घडले. येथिल बागायतदार संतोष गावडे यांच्या बागेतील काही कलमांची पडझड झाली. यात त्यांचं मोठं नुकसान झालं. तालुक्यातील बहुतांश गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.