
सावंतवाडी : सावंत भोसले कुलस्वामिनी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी संपन्न होत आहे. कुणकेरी, भवानीवाडी येथे हा उत्सव होणार आहे.
सकाळी ८.०० वा. मानसन्मान, सकाळी १० वा ओटी भरणे, दुपारी ३.३० पासून महाप्रसाद, रात्रौ ८.०० वा.मांड भरणे, रात्रौ ११.०० वा. गोंधळी पुराण व शनिवार दि. ३ मे २०२५ रोजी सकाळी ६.३० वा. गोंधळाची सांगता होणार आहे.
या निमित्ताने उपस्थित रहाण्याचे आवाहन प्रकाश वसंत सावंत भोसले, पुंडलिक गंगाराम सावंत भोसले, शशिकांत सावंत, नितीन सावंत, अभिजीत सावंत व समस्त भवानीवाडीकर सावंत-भोसले परिवारान केलं आहे.