
कणकवली : कणकवली शिक्षण संस्था, कणकवली संचलित कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयात दि. ३ जानेवारी २०२५ रोजी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस्. व्ही. सोनुर्लेकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, कार्यक्रमास सुरुवात केली. त्यांनी प्रथम व द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थ्याना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणतील योगदान व त्यांचे कार्य समाजातील विविध घटकांपर्यत पोहचविणे व त्यांनी रुजविलेली शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे, गरजेचे आहे, असे मौलिक मार्गदर्शन केले. महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून, अध्यापक विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती. एस्. डी. गायकवाड यांचा मा. प्राचार्याच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर श्रीमती. एस. डी. गायकवाड (अध्यापकाचार्या) यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनपट उलगडला. या कार्यक्रमास अध्यापक विद्यालयाचे श्री.पी.ए. वळवी (अध्यापकाचार्य) श्री. निलेश पारकर (क. लिपीक) व प्रथम व द्वितीय वर्षाचे सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमास कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीचे डॉ. एस्.एन्. तायशेटे (चेअरमन) श्री. डी. एम्. नलावडे (सचिव) श्री. एम.ए. काणेकर (उपचेअरमन) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.पी.ए.वळवी (अध्यापकाचार्य) व आभार कु. मृणाल सावंत (द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी) हिने मानले.