क्रांतीज्योती सावित्री बाई फुलेंना देवगड पं. स.च्यावतीने अभिवादन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 04, 2024 14:38 PM
views 145  views

देवगड : क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती पंचायत समिती देवगड येथे मोठया थाटात पार पडली. यावेळी पंचायत समिती देवगड अधिक्षक मेधा राणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मुख्यसेविका पुजा सावंत यांनी आपले मत मांडले.

यावेळी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, वरीष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे, मुख्यसेविका राखी राणे ,वरीष्ट सहाय्यक विलास लोके, ग्रामसेविका संगिता राणे, ग्रामसेविका रेश्मा गोवळकर, कनिष्ट सहाय्यक उमेश ठाकुर, वरिष्ट सहाय्यक कुंदा बोंडाळे, वरीष्ट सहाय्यक प्रियांका थोपटे, कनिष्ट सहाय्यक नितीन कोयंडे, हवालदार अरुणा लाड, डाटा ऑपरेटर मोहिनी खडपकर , तांत्रिक सहाय्यक भुषण जोगल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली मेस्त्री तर आभार प्रदर्शन हर्षदा बोथिकर केले.