पर्यावरण रक्षणासाठी छोट्या कबीरचा कृतीतून संदेश

Edited by: विनायक गांवस
Published on: September 18, 2024 09:17 AM
views 129  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मध्ये शिकणारा कबीर हेरेकर हा अगदी लहान वयातच निसर्गाचे संवर्धन व पर्यावरण रक्षणाचे कार्य करत असून त्याने मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आंबा, काजू, फणस व पेरुची रोपे व बिया गोळा करून त्यांची लागवड जंगलात जाऊन केली. 


मागच्या वर्षी कबीर ने 257 लागवड केली होती आणि या वर्षी त्याने एकूण 306 रोपे व बियांची लागवड केली. अशा प्रकारे कबीर ने आपली गणेश चतुर्थीची सुट्टी केवळ मोबाईल व टीव्ही मध्ये न घालवता या सुट्टीचा सदुपयोग निसर्गाशी जवळीक निर्माण करून केले. आज प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे हेच संदेश आपल्याला कबीरच्या या कार्यातून मिळाले. कबीर हा नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून इतर मुलांना व समाजाला एक वेगळे उदाहरण सादर करत असतो.