
कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव गावा मध्ये गणेश मंदिराचा चौथा वर्धापन दिन उद्या 10 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा होत आहे.
सकाळी 8 वाजता गणेश पूजा , नित्याची पूजा, पुण्य वाचन, मंदिर शुद्धी, नंतर 10 ते 12 सहस्त्र आवर्तने दुपारी तीर्थप्रसाद दुपारी 3 नंतर भक्तांचे अभिषेक सायंकाळी 5: 30 वाजता भजन संध्या महिला भजन मंडळाचे तसेच समय नृत्य व रात्री 8; 30 वाजता मनोज मेस्त्री यांचे सुमधुर गायन असे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन परशुराम झगडे यांनी केला आहे.










