सावंतवाडी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी भाजप कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते वीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वीर सावरकरांचे विचार जपण्याचं काम आम्ही करत आहोत असं ते यावेळी म्हणाले. भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सावरकरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, अमित परब, राजन राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.