
सावर्डे : कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी यांच्यावतीने मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाचा शेकडा निकाल 97.43 एवढा लागला आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातून मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून 272 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 265 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत व विद्यालयाचा शेकडा निकाल 97.43 इतका लागला आहे. विद्यालयातून आर्या नांदिवडेकर 99%,आरोही क्षीरसागर 98.40%, स्वरा सरमळकर 97.80% गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटविण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पैकी विशेष प्रावीण्य 68 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 106 विद्यार्थी व द्वितीय श्रेणी 71 विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे. 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा उल्लेखनीय आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर,सचिव महेश महाडिक,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण प्रेमींनी अभिनंदन केले असून सावर्डे परिसरातून ग्रामस्थांच्या कडूनही या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. आर्या नांदिवडेकर प्रथम क्रमांक, आरोही क्षीरसागर द्वितीय क्रमांक, स्वरा सरमळकर तृतीय क्रमांक.