
सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालय सावर्डे या विद्यालयात गांधी तीर्थ जळगाव यांचे उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन दैनंदिन जीवनातील टाकाऊ वस्तु पासून खेळणी तयार करणे व टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. दैनंदिन जीवनातील अनेक वापरलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करून त्यांच्या नावीन्यपूर्ण वस्तू तयार करण्याने कचरा व्यवस्थापना करणे सुलभ होते व विद्यार्थी तसेच कौशल्य विकासासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयोगी ठरतात.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ वस्तु पासून खेळणी बनवणे या सत्राचे आयोजन केले. या सत्रात विद्यार्थ्यांनी बाटलीचे झाकण, स्ट्रॉ, कागदाचे तुकडे, पुठ्ठा, प्लास्टिकच्या वापरलेल्या विविध वस्तूंचा वापर करुन नवीन खेळणी तयार केली.या खेळण्यातून 'खेळ' हा एकमेव हेतू लक्षात न घेता 'खेळातून शिक्षण' हा हेतू साध्य करताना तयार केलेल्या प्रत्येक खेळण्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे याचा उलगडा करण्याचा आहे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मदत झाली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे,पर्यवेक्षक उद्धव तोडकर, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.