
कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव गावामधील गणेश मंदिराचा पहिला वर्धापन दिन शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे.
त्या निमित्त सकाळी सकाळी ८.३० वा.नित्याची गणेश पूजा नंतर सहस्त्र आवर्तने सकाळी १०.०० ते १.०० वा. नंतर आरती दुपारी महाप्रसाद तसेच महिलांचे श्रुश्राव्य भजन ,३ वा सत्यनारायण महापूजा - तीर्थप्रसाद, सायं ५ वा. पासून रात्रौ ८ वाजता - शास्त्रीय गायन व अभंग, नाट्यपद भावगीतांची मैफिल गायक: मनोज मेस्त्री (पं.समीर दुबळे यांचे शिष्य) असे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या वर्धापन दिनानिमित्त होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन
पर्शुराम श्रीधर झगडे ९४२१२६६७८३ यांनी केले आहे