गजर दत्त नामाचा | निमित्त सौर दत्त यागाचं

Edited by: भरत केसरकर
Published on: February 26, 2024 14:46 PM
views 76  views

कुडाळ : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..च्या नामाचा गजर करत सौर दत्त याग निमित्ताने शेकडो भाविक भक्तांनी गेले तीन दिवस माणगांव येथील दत्त मंदिरात उपस्थिती दर्शविली होती.त्यामुळे येथील दत्त मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता.सौर दत्त याग निमित्ताने मंदिर ट्रस्ट घ्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते.दरम्यान सोमवारी मोठ्या उत्साहात सौर दत्तयागाची सांगता झाली.

कुडाळ तालुक्यातील श्री दत्त मंदिर, माणगांव येथे ‘श्री सौर दत्तयाग 2024 निमित्ताने शुक्रवार  पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शविली होती.शुक्रवारी सकाळी 7 वा.पासून अखंड नामस्मरणास प्रारंभ, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी आरती, श्रींचा पालखी सोहळा पार पडला. शनिवारी  सकाळी नामस्मरण समाप्ती, ग्रामदेवता, श्रींचे जन्मस्थान व प.पू. नांदोडकर स्वामी समाधी स्थानावर अभिषेक पूजा, पुण्याहवाचन, यज्ञमंडप देवता स्थापना, ग्रह, वास्तु, हवनादिक धार्मिक विधी प्रारंभ, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद. दुपारी गुहेवर श्री सत्यदत्तपूजा व तीर्थप्रसाद , दुपारी तबला त्यानंतर  गीतरामायण,आरती त्यानंतर श्रींचा पालखी सोहळा, रात्री हभप भास्करबुवा इंदुरकर, नागपूर यांचे किर्तन संपन्न झाले.रविवारी नैमित्तिक पूजा विधी व श्री सौरदत्तयाग जप व हवन, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी  भजन,दुपारी गायन, सायंकाळी आरती, त्यानंतर श्रींचा पालखी सोहळा, रात्री  कीर्तन पार पडले. सोमवारी श्री दत्त मंदिरात सकाळी 8 वा.पासून अभिषेक, महापूजा, सकाळी श्री सौरदत्तयाग, बलिदान, पुर्णाहुती, महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी प्रवचन,भजन, गायन, सायंकाळी तालसंध्या तबला सहवादन,त्यानंतर  बहारदार गोफ नृत्य,सायं आरती त्यानंतर श्रींचा पालखी सोहळा, रात्री किर्तन  आदि कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, आदी मोठ्या शहरातुनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यामुळे मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता.या कार्यक्रमासाठी भक्तांनी मोठया प्रमाणात उपस्थितीती असते त्यामुळे पोलिसांनी सुध्दा वाहतूक कोंडी होवू नये यासाठी चांगले नियोजन केले होते.दुसरीकडे सांगता समारंभ दिनी प्रतिवर्षी प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाकडून मोफत सरबत वाटप केले होते त्याचा भक्तांनी लाभ घेतला.