कट्टर हिंदुत्ववादी नितेश राणेंना मुस्लीम मतांची गरज का..?

सतीश सावंत यांचा सवाल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 29, 2024 14:26 PM
views 392  views

वैभववाडी : आ.नितेश राणे कट्टर हिंदुत्ववादी आहेत तर त्यांना आता मुस्लीम मतांची गरज काय असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याना आमदार नितेश राणेंकडुन वेगवेगगळी आमिषे आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शिवसेना नेते सतिश सावंत यांनी येथे केला. येथील ठाकरे शिवसेना संपंर्क कार्यालयात श्री.सावंत यांची पत्रकार परिषद झाली.यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे,तालुकाप्रमुख मंगेश लोके,स्वप्निल धुरी,संदीप सरवणकर,सुरेश पांचाळ,पढंरी तावडे,जितेंद्र तळेकर,विलास नावळे,दिव्या पाचकुडे,रोहीत पावसकर,जावेद पाटणकर,गुलझार काझी आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन केल्यानतंर आमदार नितेश राणे हे स्वत कट्टर हिंदुत्ववादी बनल्याचा आव आणत होते.ते कट्टर हिंदुत्ववादी असतील तर त्यांना आता मुस्लीम मतांची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.श्री.राणे आतापर्यत .शिवसेना शिल्लक नाही असे वारंवार सांगत होते.परंतु आता ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा ते वेगवेगळ्या माध्यमातुन प्रवेश घेत आहेत.याचा अर्थ जिल्हयात शिवसेनेचे अस्तित्व आहे हे त्यांनी मान्य केले आहे.दहा वर्षात जर विकास कामे केली असती तर त्यांना आता कार्यकर्त्याना वेगवेगळी आमिषे दाखविण्याची गरज भासली नसती अशी टिका देखील त्यांनी केली. ते म्हणाले स्वाभिमान संघटनेचे काही पदाधिकारी जिल्हयात आले असुन येथील ठाकरे शिवसेनेच्या मुस्लीम कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांना धमकावीत आहेत.निवडणुक आयोग,पोलीस खात्याने यांची नोंद घ्यावी.निवडणुक आयोग भाजपाचा घरगडी आहे.त्यामुळे आपण तक्रार करणार नाही अशी टिका देखील केली.