साटेली - भेडशी मंदिरातील सीसीटिव्ही - एलसीडी चोरीस

Edited by: संदीप देसाई
Published on: July 14, 2023 10:48 AM
views 137  views

दोडामार्ग : साटेली भेडशीत एका बंद घरात चोरीचा प्रयत्न झाला असताना त्याच दिवशी गावच्या श्री शांतादुर्गा व देव पुरमार मंदिरातील सीसीटीव्ही एलईडी स्क्रीन व दोन डोम कॅमेरा अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. याबाबतची फिर्याद सदानंद महादेव धर्णे यांनी दोडामार्ग पोलीसात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवार १२ जुलै रोजी रात्री ८ वाजता साटेली भेडशी येथील श्री शांतादुर्गाव देव पुरमार मंदिराची पूजाअर्चा करुन शिवराम धर्णे मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करुन घरी गेले. बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते व तुळशीदास धर्णे यांनी मुख्य दरवाजा उघडला असता उजव्या बाजूचा दरवाजा उघडा दिसला. पाहणी केली असता सुमारे ५ हजार रुपये किमतीची सीसीटीव्ही स्क्रीन व ३ हजाराचे दोन डोम कॅमेरे चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. त्यांनतर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.