साटम महाराजांचा जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

Edited by:
Published on: May 11, 2024 08:12 AM
views 143  views

सावंतवाडी : योगियांचे योगी असलेल्या दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साटम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. साटम महाराजांच्या या जयंती उत्सवात भाविक साटम महाराज चरणी लीन झाले. यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे काकड आरती, त्यानंतर अभ्यंगस्नान, झाल्यानंतर सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते पाद्यपूजा आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी साटम महाराजांच्या उत्सव मूर्ती व समाधी परिसराला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले. 

यावेळी समाधी मंदिरात अक्षय सावंत व भक्ती सावंत यांच्याहस्ते सत्यनारायण महापूजा झाली. दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी दाणोलीचे तीर्थक्षेत्र असलेल्या नागझरीलाही भाविकांनी भेट दिली. यावेळी कोकणातील संतांचे संत शिरोमणी असलेल्या साटम महाराजांच्या विविध क्षेत्रातील मान्यवरानी साटम महाराजांचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा महाआरतीनंतर पालखी सोहळ्याने  या जयंती उत्सवाची सांगता झाली.