गुरुवारी साटम महाराज पुण्यतिथी उत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2023 21:49 PM
views 667  views

सावंतवाडी : दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिरामध्ये तुकाराम बीज निमित्ताने श्री समर्थ साटम महाराजांची पुण्यतिथी उत्सव गुरुवार दि. ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे.

श्री समर्थांचा पुण्यतिथी उत्सव तुकाराम बीज दिवशी साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात. श्री समर्थ साटम महाराज यांचा दाणोली येथे समाज समाधी मंदिर तसेच जवळच निवास आणि नागझर या भागात देखील भावीक मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात.

दाणोली समाधी मंदिर येथे तुकाराम बीज दिवशी श्री समर्थ साटम महाराजांच्या उत्सव साजरा करतानाच भाविकांना प्रसाद व महाप्रसादाचा लाभही दिला जातो. देवस्थान ट्रस्ट विश्वस्थ यासाठी पुढाकार घेतात या निमित्ताने अलोट गर्दी देखील मंदिरामध्ये होते. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्रीमंत खेमराजे शिवराम सावंत- भोसले यांनी भाविकांना केले आहे.