
दोडामार्ग : परप्रांतीयांच आपण नेतृत्व करू नका, स्थानिकाना न्याय द्या असे, आपण परप्रांतीय लोकांनाचं सहकार्य करता असा आरोप संदेश पारकर यांनी तहसीलदार अमोल पवार यांच्यावर केला. त्याला तितक्याच प्रखरपणे तहसीलदार अमोल पवार यांनी विरोध केला. कोण परप्रांतीय मी कुणाला ओळखत नाही, आपण तसा एक पुरावा द्या, मी नोकरी सोडतो, राजीनामा देतो असे तोडीस तोड उत्तर तहसीलदार अमोल पवार यांनी दिलं.