
सावंतवाडी : चराठा ग्रामपंचायतीचा कारभार हा गाव विकास पॅनलच्या माध्यमातूनच करणार असून पक्षीय राजकारण गावात येऊ देणार नाही. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सरपंच व सदस्यांचा सत्कार झाला. गावच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचा शब्द मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. गावच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही, कोणत्याही पक्षात आम्ही प्रवेश केलेला नसून गावविकासास कटिबद्ध आहे अस मत नवनिर्वाचित सरपंच प्रचिती कुबल यांनी व्यक्त केले.