सरपंच गुणाजी गावडे यांनी स्वखर्चातून मुलांना केलं गणवेश वाटप

Edited by: विनायक गावस
Published on: August 01, 2023 12:47 PM
views 306  views

सावंतवाडी : वेत्ये अंगणवाडी येथे मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. सरपंच गुणाजी गावडे यांनी स्वखर्चातून हे गणवेश वाटप करण्यात आले. आमच्या वेत्ये गावांत एकमेव अंगणवाडी असून त्यात 15 मुले आहेत. त्यांना गणवेशसाठी अंगणवाडी सेविका यांची मागणी लक्षात घेता व आपल्या गावातील लहान मुलांचे मनोबल वाढवून जास्तीत जास्त मुले अंगणवाडी मध्येप्रवेश घ्यावा यासाठी सरपंच गावडे यांच्याकडून गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी शेखर खांबल, शाळा मुख्याध्यापक गावित तसेच मुलांचे पालक उपस्थित होते