
वैभववाडी : एस. आर. दळवी (आय) फाउंडेशन व सिंधुदुर्ग टीचर टॉक फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये संतोष वारंग यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. फाउंडेशनच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये
‘बदलती शिक्षण पद्धती व शिक्षकांसमोरील आव्हाने"हा विषय होता. या स्पर्धेत जिल्हाभरातून तब्बल ६१ निबंध प्राप्त झाले. शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती, नव्या धोरणांमुळे निर्माण झालेली आव्हाने व शिक्षकांची भूमिका यावर स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. ही स्पर्धा अंगणवाडी ते महाविद्यालयीन स्तरावरील सर्व शिक्षकांसाठी खुली ठेवण्यात आली होती.त्यामध्ये संतोष सिताराम वारंग (जि. प. शाळा वालावल नं. १, कुडाळ) प्रथम,प्राजक्ता गोपाळ सावंत स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे-मालवण(द्वितीय), संतोष यशवंत मोहिते (बालभवन विद्यामंदिर, मौदे-वैभववाडी) तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेतील उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक शिवकन्या सुभाष सांगवे (जि. प. शाळा सांगेली सावरवाड, सावंतवाडी) तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक देवयानी देवदास मेस्त्री (जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा दाभोली नं. १, वेंगुर्ला) यांनी मिळविला. प्रा. नागेश कदम, विठ्ठल कदम, संतोष वालावलकर व कमलेश गोसावी प्ररीक्षक म्हणून काम पाहिले. या उपक्रमातील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र मार्च महिन्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांचे संस्थापक रामचंद्र दळवी, सीता दळवी, राज्याध्यक्ष महेश सावंत, जिल्हाध्यक्ष चेतन बोडेकर, उपाध्यक्ष विजय गावडे, सरचिटणीस अमर वाघमारे तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.










