संतोष वागळे यांचं निधन

Edited by: विनायक गावस
Published on: August 10, 2023 21:03 PM
views 329  views

सावंतवाडी : शहरातील व्यापारी व बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाचे सदस्य संतोष वागळे यांचं गुरुवारी सकाळी निधन झाल. अल्पशा आजाराने उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नवरात्र उत्सवासह विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. त्यांच्या निधनानं वागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाच्यावतीने आज सायंकाळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.