'लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कारा'ने संतोष तळवणेकर सन्मानित !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 02, 2024 14:02 PM
views 190  views

सावंतवाडी : अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिवाजी तळवणेकर यांना कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम कोल्हापूर येथील लोकराजा राजर्षी शाहू महाराज सभागृहात संपन्न झाला.

अविष्कार फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार  व त्याच्या निवड समितीने सावंतवाडी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांची पुरस्कारासाठी निवड केली .यावेळी हा पुरस्कार इस्त्रोचे निवृत्त अभियंता  आणि सध्याचे इस्त्रोचे गुजरात युनिट प्रमूख  नगिनभाई प्रजापती अहमदाबाद गुजरात याच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील विवध जिल्यातील पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी अविष्कार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संजय पवार, ज्येष्ठ लेखक किसनराव कुराडे, डॉ एम बी शेख, डॉ. प्रकाश चौधरी, दत्तात्रय सूर्यवंशी रंगराव सूर्यवंशी, व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. संतोष तळवणेकर हे गेली 20 वर्षे सावंतवाडी तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. कोरोना कालावधीत त्यांनी समाजहित व विद्यार्थीहित जोपासत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले व कौतुकास्पद कामगिरी बजावली. गेली अनेक वर्षे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या कार्यकलावधित त्यांनी अनेक सुधारणा व नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच ते राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी काम करत आहेत. या माध्यमातून विद्यार्थी हिताचे उपक्रम व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवत असतात. त्यामुळे त्याच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देउन गौरविण्यात आले.