
सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्राच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमात वैभववाडी येथील संतोष श्रीधर टक्के यांनी 72.75 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. कणकवली येथील सर्वेश हरी भिसे यांनी 69.75 टक्के गुणांसह द्वितीय तर म्हापण येथील संदीप प्रकाश चव्हाण यांनी 69 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना केंद्र संयोजक राजेश मोंडकर, संदीप तेंडोलकर, महेंद्र पराडकर,सचिन खुटवळकर, अजय लाड यांचे मार्गदर्शन लाभले. केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर, मार्गदर्शक डॉ. जी. ए. बुवा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमाची सन 2024-25 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी 30 जूनपर्यंत नियमित शुल्कासह प्रवेशासाठी अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन अभ्यासकेंद्रातर्फे करण्यात आले आहे.