विशेष कार्यकारी अधिकारीपदी संतोष गांवस

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 30, 2023 16:33 PM
views 202  views

सावंतवाडी : शहरातील लक्ष्मण उर्फ संतोष सुभाष गांवस यांची शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०२८ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या शिफारसीनुसार पालकमंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ज्या कार्यकर्त्यांची नावे सुचवितात त्यांचीच या पदावर वर्णी लागत असते. त्यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच सर्वस्तरातून अभिनंदन केलं जातं आहे.