मनसेच्या संतोष मयेकर यांचा 'कोकणसाद LIVE' च्या स्मार्ट लीडर पुरस्काराने सन्मान

आमदार निलेश राणेंच्या हस्ते पुरस्कार वितरित
Edited by:
Published on: March 02, 2025 17:26 PM
views 332  views

देवगड : देवगडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगडतालुका अध्यक्ष  संतोष मयेकर यांची कोकणसाद Live २०२५ च्या यंदाच्या सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील स्मार्ट लीडर पुरस्कारासाठी निवड झाली. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणेंच्या हस्ते शनिवारी कणकवली येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कोकणच महाचॅनेल कोकणसाद लाईव्हचा ११वा वर्धापनदिन शनिवारी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला.या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.यावर्षी राजकीय क्षेत्रात देवगड तालुक्यातील मनसे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांची निवड करण्यात आली होती.श्री संतोष मयेकर हे गेली कित्येक वर्षे सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात काम करीत असून या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करून जनतेला सेवा देत आहेत.

याचबरोबर शिवजयंती उत्सव सार्वजनिक उत्सव,या उत्सवांच्या च्या माध्यमातून देखील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकणसाद लाईव्हने सामाजिक राजकीय क्षेत्रातील मानाचा स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. आम. निलेश राणेंच्या हस्ते यावेळी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.