
देवगड : तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० वी जयंती देवगड तहसील कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाचे माजी सचिव प्रशांत वाडेकर, जामसंडे येथील तेली समाजाचे कार्यकर्ते विनोद तेली तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी तेली समाजाचे माजी सचिव श्री. वाडेकर यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीतून कसे बाहेर आले या मागची सत्य माहिती देताना संताजी जगनाडे महाराजांचे कार्य स्पष्ट केले.