
वेंगुर्ले : आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित व श्रीराम समर्थ वेंगुर्ला पुरस्कृत 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी 2026 सालातील पहिली जिल्हास्तरीय संस्कृत वक्तृत्व स्पर्धा रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वेंगुर्ला नगर वाचनालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीसाठी गणपती स्तोत्र (3 मिनिटे) व इयत्ता आठवी ते दहावीसाठी माझी आई (3 मिनिटे) असे विषय देण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी स्पर्धेच्या विविध माहितीकरिता व नाव नोंदणी करिता पांडुरंग सामंत 9420823048 तसेच डॉ.वंदन वेंगुर्लेकर 9823604356 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










