
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचे प्रभाग 15 चे उमेदवार संकेत श्रीधर नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी सकाळी शहरातील नाथ पै नगर येथे पार पडला. उबाठा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शहरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, प्रभाग क्र.15 चे नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, राजू शेट्ये, सुशील आळवे, योगेश मुंज, अजित काणेकर, मंगेश राणे, रिमेश चव्हाण, चेतन वालावलकर, चेतन मुंज, अमित राणे, संदेश मयेकर, राजन महाडगूत, समीर पावसकर, बंड्या राणे, महेंद्र नाईक, संदेश जाधव, बाळा कुडतरकर, समीर सावंत,बाबू जाधव, गुरु मोर्ये, कमलेश नारकर, संकेत कुडतरकर आदी उपस्थित होते.










