संकेश्वर सावंतवाडी रेडी रस्ता सावंतवाडीतून झालाच पाहिजे : बबन साळगावकर

Edited by: विनायक गावस
Published on: July 19, 2023 14:39 PM
views 107  views

सावंतवाडी : सुरुवातीपासूनच संकेश्वर सावंतवाडी रस्ता अशी मान्यता मिळाली होती परंतु आत्या सध्या स्थितीमध्ये त्यात बदल केल्याचं समजतं हा सावंतवाडीतील नागरिकांवर अन्याय आहे हा अन्याय शहरवासीय कधी सहन करणार  नाहीत आता नाही तर कधीच नाही ही भूमिका शहरवासीयांना आता घ्यावीच लागेल.

मुंबई गोवा हायवे रस्ता शहराच्या बाहेरून गेल्यानंतर त्याचा परिणाम शहराच्या आर्थिक घडीवरती मोठ्या प्रमाणात झाला आहे यातच आता संकेश्वर बांदा असा रस्ता मंजूर करून शहराची आर्थिक घडी विस्कटणार आहे. त्यातच आता पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर हैदराबाद बेळगाव याही गाड्या बावळट मार्गे गोव्याकडे जात आहे सदर रस्ता मोठ्या केल्यानंतर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात शहरावरती होणार आहे.

शहराला उर्जित अवस्था आणण्यासाठी पूर्वी मंजूर असलेला संकेश्वर सावंतवाडी रस्ता सावंतवाडीच्या रिंग रोड अर्थात वळण रस्त्याने रेडी कडे नेल्यास शहराला उर्जित अवस्था येऊ शकते शहरवासीयांना आता नाही तर कधीच नाही अशी भूमिका घ्यावी लागेल यासाठी शहराची एकजूट दाखवावी लागेल शहरातील व्यापार उदिमा वाढण्यासाठी व्यापारी सक्षम होण्यासाठी शहरातील व्यापार उदिमा वाढण्यासाठी शहर सक्षम करण्यासाठी सर्वपक्षीय सर्व व्यापारी संघटना वाहतूक व्यवसायिक संघटना रिक्षा संघटना मालवाहतूक संघटना हॉटेल व्यवसाय पर्यटनावरती काम करणारे पदाधिकारी शहर व्यापारी संघटना क्रिकेट क्लब कबड्डी क्लब संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

याबाबतची प्राथमिक चर्चा माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, महाराष्ट्राची माहिती खात्याचे माजी अधिकारी सतीश पाटणकर, माजी नगरसेवक विलास जाधव यांच्याशी झाली असून सर्व पदाधिकारींना वैयक्तिक भेटून सावंतवाडीतील व्यापार सावरण्यासाठी एक बैठक घेऊन दिशा ठरवण्यात येणार आहे.