
सावंतवाडी : शहरवासीयांना डासांचा होणारा त्रास लक्षात घेऊन न.प.मुख्याधिकारी यांनी त्यावर उपाययोजना करावी. डास प्रादुर्भाव रोखण्यासाठी लिक्विडद्वारे डास निर्मूलन नगरपरिषदेन नेमकं कुठे केलं ? हे त्यांनी सांगाव. सावंतवाडी शहर हे सर्वोदयनगर ते तिलारी कॉलनी, गोठण ते झिरंगवाडी, निरूखे ते कावलेवाडी इथपर्यंत पसरलेल आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी रस्त्यावर उतरून पहाणी करावी अशी मागणी भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष अँड. संजू शिरोडकर यांनी केली आहे.
शहरात डास निर्मूलन अभियान राबविण्यात याव अशी विनंती करताना गेली दोन वर्षे मशिनद्वारे डास निर्मूलन फवारणी का झाली नाही ? असा सवाल त्यांनी केला आहे. लिक्विड टाकून डास निर्मूलन कोणत्या भागात केलं गेलं असाही प्रश्न उपस्थित केला.. तर शहरात प्रत्यक्ष पहाणी करून मुख्याधिकारी यांनी डास निर्मूलन अभियान हाती घ्यावं. डासांपासून होणारा हा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. अन्यथा रोगराईला सामोरे जावे लागेल, त्याला प्रशासन जबाबदार राहील असं मत अँड. संजू शिरोडकर यांनी व्यक्त केले.