
सावंतवाडी : भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली यांना घरचा आहेर दिला आहे. आपण विधानसभेला इच्छुक असुन वरिष्ठ नेत्यांनी मला कामाला लागयला सांगितले आहे. कणकवली, मुंबई, पुणे, कुडाळातील 'पर्यटक' उमेदवार इथे चालणार नाही असा दावा करताना स्वपक्षीय राजन तेलींचा देखील नाव न घेता त्यांनी खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले, वरिष्ठ नेत्यांनी मला आमदारकीच्या तयारी लागण्याच्या सूचना दिल्याने आगामी विधानसभा निवडूक मी लढवणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात बाहेरच्या लोकांना स्थान नाही. त्यामुळे मी या ठिकाणांहून पक्षाकडे ठामपणे उमेदवारी मागून तिकीट मिळाल्यास जिंकून येणार आहे. पर्यटक उमेदवार इथे चालणार नाही. इथे स्थानिक उमेदवारच चालतो. जो लोकांच्या २४ तास सोबत असेल असा टोला राजन तेली व विशाल परब यांच नाव घेता त्यांनी लगावला.
दरम्यान, पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मताधिक्य मिळाले आहे. गेली २० वर्ष तिकडे एकहाती सरपंच आमचा बसत आहे अशीही टिका त्यांनी करत तेलींनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र असताना मोठ मताधिक्य अपेक्षित होत. परंतु, अल्पसंख्याक व दलित समाज यांची साथ भाजपला मिळाली नाही. २० पैकी ४ बुथवरच विरोधकांना मताधिक्य मिळाले. त्याचा अधिक असल्यानं आमच मताधिक्य कमी पडलं असं मत श्री.परब यांनी व्यक्त केले. तर ही मत भाजपला का पडली नाही ? याच चिंतन करून गैरसमज दूर केले जातील. भविष्यात हे मताधिक्य वाढलेलं दिसेल असा दावा संजू परब यांनी केला. यावेळी माजी सभापती संदीप नेमळेकर, गोविंद केरकर आदी उपस्थित होते