
सावंतवाडी : मडुरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब विजयाचे शिल्पकार ठरले. सलग पाचव्यांदा त्यांनी आपल्या विचारांचा सरपंच ग्रामपंचायतीत विराजमान केला आहे.
भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब, माजी सरपंच सुरेश परब व शक्तिकेंद प्रमुख यशवंत माधव यांनी मेहनत घेत मडुरा ग्रामपंचायती वरील सत्ता कायम राखली आहे. भाजपा पुरस्कृत गाव विकास पॅनलचे थेट सरपंच पदाचे उमेदवार उदय चिंदरकर यांनी ५८८ इतकी मते मिळवित प्रतिस्पर्धी गाव परिवर्तन पॅनेलचे उमेदवार प्रितेश गवंडी पराभव केला. भाजपा पुरस्कृत पॅनलचे ५ तर गाव परिवर्तन पॅनलचे ४ सदस्य निवडून आले. सर्व विजयी उमेदवारांचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, माजी सरपंच सुरेश परब, शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी अभिनंदन केले.दरम्यान, बांदा, शेर्ले, माजगाव आदी भागात देखिल संजू परब यांनी भाजपचा झेंडा फडकवला साठी विशेष मेहनत घेतली.