संजू परब यांचा बांद्यात धमाका

उबाठाला मोठा धक्का
Edited by: विनायक गावस
Published on: October 25, 2025 20:22 PM
views 138  views

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी पक्षप्रवेशांचे धमाक्यांवर धमाके सुरूच ठेवलेत. आज सायंकाळी बांदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील युवा तालुकाप्रमुख रियाज खान यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उबाठाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे सेनेत स्वागत केले.


यावेळी पक्ष प्रवेश केलेला प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला जाईल असे अभिवचन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिले. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, तालुका संघटक गुरुनाथ सावंत, बांदा शहर प्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांसह अन्य उपस्थित होते.