संजू परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा

Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 17:22 PM
views 210  views

सावंतवाडी : भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस शनिवार १९ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी साडेदहा वाजता संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.

दरम्यान, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बंटी पुरोहीत यांच्या माध्यमातून संजू परब यांच्या वाढदिवसा निमित्त  मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रामेश्वर प्लाझा येथील ‘टायटन ऑप्टीकल हब ‘ येथे होणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बंटी पुरोहीत यांनी केले आहे.