
सावंतवाडी : भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बंटी पुरोहीत यांच्या माध्यमातून उद्या शनिवार १९ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
रामेश्वर प्लाझा येथील 'टायटन ऑप्टीकल हब' येथे हे शिबीर शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे. यावेळी डोळे तपासणी करणार्या रुग्णांना कमीत कमी दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बंटी पुरोहीत यांनी केले आहे.