LIVE UPDATES

संजू परबांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

आसोलीत सुपारीच्या झाडांचे वाटप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 10:17 AM
views 64  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आसोली हायस्कूल आसोलीमध्ये वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने सुपारीच्या झाडांचे वाटप करून व हायस्कूल साठी फॅन भेट देण्यात आला. तसेच नारायण विद्यामंदिर आसोली न. १ शाळेत सुपारीच्या झाडांचे वाटप करण्यात आले.

 यावेळी वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळा दळवी, पं स माजी सभापती व उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, तालुका सचिव संजय गावडे, सत्यवान साटेलकर, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. किनळेकर,  शिवसेना पदाधिकारी नरेंद्र मोड़कर,  संजय धुरी, विठ्ठल जाधव, तसेच ग्रामस्थ राजाराम गावडे, राजेश गावडे, गुरव मॅडम, राऊळ मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांकडून संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.