डिपॉझिट जप्त झालेल्यांनी राणे, केसरकरांवर बोलू नये : संजू परब

Edited by: विनायक गांवस
Published on: November 01, 2024 17:48 PM
views 389  views

सावंतवाडी : पराभूत लोक एकत्र येऊन राणे, केसरकरांवर टीका करत आहेत. माजी आमदार परशुराम उपरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार राजन तेली यांना जनतेने नाकारले असून त्यांची डिपॉझिट निवडणूकांत जप्त झालेली आहेत. अशी पराभूत मंडळी तिनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक केसरकर यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे त्यांनी आपली उरलीसुरली किंमत घालवून घेऊ नये असा पलटवार शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी केला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, माजी आमदार परशुराम उपरकर हे ब्लॅकमेलर आहेत. त्यांना कणकवली व सावंतवाडीतील जनतेनं नाकारले आहे. यांची डिपॉझीट निवडणूकांत जप्त झालीत. तर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच मी एकदा व विधानसभेत केसरकरांनी डिपॉझिट जप्त केलं आहे.‌माजी आमदार राजन तेली यांना दोनवेळा जनतेने नाकारले असून आता तिसऱ्यांदा त्यांचा पराभव होणार असल्याचे मत श्री.परब यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, विशाल परब यांच्यावर मळगाव येथे हल्ला करणारा कामगार हा त्यांच्या बागेत काम करत होता असा आरोप संजू परब यांनी केला. याबाबत त्यांनी पोलिसांनी माहिती दिली असून योग्य तपास न झाल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, परिक्षीत मांजरेकर, सत्यवान बांदेकर, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.