माझ्या नादाला लागू नये: संजू परब

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा इशारा
Edited by: विनायक गांवस
Published on: October 25, 2025 21:33 PM
views 307  views

सावंतवाडी : उबाठाचा प्रवेश घेताना शिवसेनेला धक्का दिल्याचे वाचल. विशाल परब यांनी हा धक्का दिल्याचे समजले. मात्र, हे लोक तासाभरात पुन्हा शिवसेनेत आलेत. श्री. परब यांनी या भानगडीत त्यांनी पडू नये, माझ्या नादाला लागू नये असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला. तर भाजप नेत्यांनी पक्षाची इज्जत घालवून घेऊ नये असाही सल्ला दिला. 

आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, संजय पेडणेकर, क्लेटस फर्नांडिस आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. परब पुढे म्हणाले, लाखे बांधवांनी हा पक्षप्रवेश फसवून घेतल्याचे सांगितले. दहशतीला घाबरून आम्ही बोललो नाही असं ते म्हणाले. विशाल परब यांची नाटक मी एका तासात उघड केलीत. माझ्या नादी लागू नये. अन्यथा, मी असा धक्का देईन की त्यांना पुन्हा माणगाव खोऱ्यात जावं लागेल. बाहेरची माणसं अन् असले प्रकार सावंतवाडीत खपवून घेणार नाही. सावंतवाडी शहरात विशाल परब यांनी ढवळाढवळ केल्यास कारनामे बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला. तसेच भाजपच्या नेत्यांनी पक्षाची इज्जत घालवून घेऊ नयेत असा सल्ला दिला.